विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जानेवारी 2002 रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी.असुन त्यापौकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे.तालुक्यात सरासरी 2500 ते 3000 मी.मी.पर्जन्यमान आहे.पर्जन्यमान आहे. या तालुक्यात एकूण 95 गांव व 43 ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणेनुसार एकूण 1,37,625 इतकी आहे.त्यामध्ये पुरूष- 69,136 व स्त्रिया- 68,489 एवढी आहे. विक्रमगड हे ठिकाण पालघर जिल्हातील नव्याने अस्तित्वात आलेले तालुक्याचे ठिकाण आहे.पूर्वेला जव्हारचा घाट,सहयाद्रीच्या रांगातील वतवडयाचा सुळका दिसतो.नौऋत्येला कोहोज किल्ला दिसतो.विक्रमगड तालुक्याच्या पश्चिमेस पालघर जिल्हा व वायव्येला डहाण्ू तालुका आहे.दक्षिणेस वाडा तालुका आहे. महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो.या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे.विक्रमगड तालुक्यात उन्हाळा,पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात.जुन जुलौे व ऑगस्ट या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी मोठया प्रमाणवर होते.या तालुक्यांतील भात शेती प्रमुख पीक असुन संपुर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अंवलबुन आहे.भात शेती बरोबरच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नांव होते.कुडाण हे गांव त्याकाळी सरहद्यीचे परकीयंाना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत होते.असे या कुडाण गांवामध्ये संस्थांनाधिपती विक्रमशहा महाराज यांनी आले पुर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरीत केले त्यामुळे कुडाण या गांवाला विशेष महत्व प्राप्त झाले. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाण या पालघरचे विक्रमगड असे नामकरण केले.विक्रमगड मधील पिंजाळ नदीवरील श्री.पंतगेश्वराचे महादेव मंदिर प्रसिध्द आहे. पांडव कालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिध्द आहे.जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा प्रसिध्द आहे. विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी,कोकणा,कुणबी, वारली,ठाकुर, महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात.विविध जाती जामातीचे लोक रहात असले तरी सर्वामध्ये सामाजिक एक्य आहे. पंरपरागत सण,उत्सव व समारंभ इत्यादी मध्ये सर्वजण गुण्यागोंविदाने राहतात.येथील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असुन वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे.विविध राजकिय पक्ष असलेतरी पक्षामध्ये (राजकीय) सामाजस्य असुन सामाजिक प्रश्नावर राजकिय पक्ष एकत्र येतात. विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व डोल नाद होय.दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात.विविध देवदेवतांचे मुखवटे घालून रात्र जागविणारे लोकांचे व निकल मनोरंजन करणारे बोहाडा हे पंरपरागत चालत आलेल्या उत्सव आहे.नवरात्र उत्सव,दहीहंडी,राष्ट्रीय सण व लग्न सोहळामध्ये संास्कृतिक प्रतिबिंब दिसुन येते. दर वर्षी त्र्यबेंकेश्वर येथे वारकराचंे ंिदडया विक्रमगड तालुक्यातील खेडयापाडयातुन निघतात विविध नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या केल्या जातात. विक्रमगड तालुक्यांत प्रामुख्याने रस्ते वाहतुक मेाठया प्रमाणावर चालते.बहुतांशी गांवे पक्या रत्याने जोडल्या आहेत.तरीही आद्याप पाडे वस्त्या या रत्यापासुन वंचित आहेत.दळण वळणासाठी प्रामुखांने,बौलगाडया,जीप,ट्रक व बस यांचा वापर केला जातो. भौगोलिक दृष्ट¶ा विक्रमगड तालुक्याचे स्थान - पुर्वेस जव्हार, पश्चिमेस पालघर, दक्षिणेस वाडा आणि उत्तरेस डहाणू या तालुक्याच्या सिमा आहेत. तसेच पश्चिमेस साधारण 45 कि.मी. अंतरावर अरबी समुद्राचा किनारा आहे. विक्रमगड तालुक्यातुन मुख्यता देहर्जे, पिंजाळ, सुर्या आणि राखाडी नद्यांचा प्रवाह वाहत असुन सुर्या नदीवर धामणी व कवडास धरणांची कामे झालेली असुन धामणी येथे सुर्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. सिमालगत असणा-या वाडा, जव्हार, डहाणू तालुक्याशी, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारे राज्य मार्ग असुन राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत बस सेवेची सुविधा पुरविण्यात येते. तसेच खाजगी जीप व इतर वाहनांची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र-गुजरात राज्यांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग साधारण 22 कि.मी. अंतरावर आहे. तर रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने किंवा वहातुकीच्या दृष्टीने नजिकचे रेल्वे स्टेशन पालघर असुन साधारण 40 कि.मी. अंतरावर आहे. विक्रमगड तालुक्याचा बहुतांश भुप्रदेश हा समतल असुन जमिन मुख्यता जांभ्या खडकापासुन बनलेली आहे. तालुक्यातील मौजे जांभे या गावाजवळ मुख्यालयापासुन 08 किमी अंतरावर नौसर्गिक पल्लुचा धबधबा असुन पावसाळयाच्या दिवसात पर्यटकांची ब-यापौकी वर्दळ असते. तसेच मुख्यालयापासुन 16 किमी अंतरावर मौजे कावळे या ठिकाणी श्री पिंजाळेश्र्वर हे शिव मंदीर असुन प्रशस्त मठाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. जेणे करुन भाविकांची त्याठिकाणी उत्तमप्रकारची सोय होते. तर 02 किमी अंतरावर मौजे नागझरी येथे श्री नागेश्रवर महादेव मंदीर आहे. मौजे हातणे या ठिकाणी एका संस्थेमार्फत वौद्यकिय सेवेच्या दृष्टीने रिव्हेरा हॉस्पिटल उभारण्यात आलेले असुन तज्ञ वौद्यकिय अधिका-यामार्फत औषधोपचार व सर्जरीची सोय उपलब्ध आहे. तसेच मौजे भोपोली येथील ढवळे मेमोरियबल ट्रस्ट मार्फत आदिवासी समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने कृषि, शिक्षण, आरोग्य व इतर विभागाच्या अनुषंगाने वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच बायफ संस्थेमार्फतही कृषि विकासाच्या अनुषंगाने उपक्रम राबविण्यात येतात. तालुक्यातील शेतजमिन सुपिक व सपाट असल्याने शेती व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशिर असुन म्ंाुबई सारखे शहर नजिक असल्याने फुलशेती / भाजीपाला पिकांची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुका विकसनशिल टप्प्यात आहे असे म्हणता येईल. या तालुक्यांत प्रामुख्याने शेती व्यवसाय मोठयाप्रमाणात उदरनिर्वाह चालविला जातो. औद्योगिक विकास ( कारखानदारी) चा विकास आजिबात झालेला नाही. विक्रमगड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे असुन वेगवेगळया केंदामधुन खालील प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व पथक आहेत.उटावली,मलवाडा,कुर्झे,तलवाडा, धामणी, बोरांडा या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध शाळांना पुरविल्या जातात. विक्रमगड परिसर हा आदिवासी बहुल असुन येथिल समाज आर्थिक/ सामाजिक दृष्ट्या पाहिजे त्या प्रमाणात विकसित झाल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन अधिसुचना आर.ई.एन. 2799/ प्र.क्र. 82/म.10/ दिनांक.13/06/1999 अन्वये विक्रमगड तालुका दिनांक 26/06/1999 पासुन कार्यान्वित झालेला आहे. विक्रमगड तालका दिनांक 01/08/2014 पुर्वी ठाणे जिल्ह्यामधे समाविष्ट होता. परंतु तद्नंतर नवनिर्मित पालघर जिल्ह्यची निमिर्ती झाल्यानंतर विक्रमगड तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यात आलेला आहे.
विक्रमगड तालुका आदर्श तक्ता.
महाराष्ट्र शासन अधिसुचना / क्र.आर. ई. एन. 2799/ प्र. क्र. 82/ म-10 दि. 23/06/1999 नुसार विक्रमगड तालुका दि. 26/ जुन 1999 पासुन निर्माण करणेंत आलेला आहे.
तालुका- विक्रमगड जिल्हा -पालघर.
1) वर्ष - 2016-2017 पंचायत समिती स्थापना - 26 जानेवारी 2002
2) तालुक्याचे नांव - विक्रमगड जिप गट- 5 पंचायत समिती गण - 10
३) क्षेत्र ( चौरस किलोमीटरमध्ये ) ५५,०२७ चौ. कि.मी.
४) लोकसंख्या १,३७,६२५ सन २०११ बचत गट ४४८ स्ञी ४४८
५)दारिद्ग रेषेची कुटूुब एकूण संख्या १६४९० गणना सन २००२२००७
अ.जा.३४१ अ.ज. १,२६,३६८ इतर १०९१६ एकूण १,३७,६२५, पुरवणी यादीतील कुटूंबे१११०
६)महसुल गावांची संख्या ९२ (१ बुडीत गाव सावा) गाव/पाडे ४२३
७) ग्रामपंचायत संख्या ४२ पैकी ग्रामदान मंडळे ३ ( माण, वाकी, नागझरी )
८) ग्रामीण रुग्णालय १ प्रा.आ.केंद्ग ३ (मलवाडा,तलवाडा,कुंर्झे) जिप दवाखाने०२(उटावली,बांधण)
९) प्रा.आ.केंद्ग पथक २ ( बोरांडा,तलावली ) उपकेंद्गांची संख्या २३
१०) अंगणवाडी २४६ मिनी अंगणवाडी ४९ एकुण २९५
११) पशु दवाखाने (श्रे१) ०२ (विक्रमगड,तलवाडा)
१२) पशु दवाखाने (श्रे२) ०५ (दादडे, साखरे ,आलोंडा ,कुंर्झे ,मलवाडा)
१३) जिप प्राथमिक शाळा २३७
स्वंयत अर्थ सहाय्यक शाळा १
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय १
खाजगी प्राथमिक (विना अनुदानित) २
खाजगी माध्यमिक (अनुदानित) ९
खाजगी माध्यमिक (विना अनुदानित) २
शासकिय आश्रमशाळा ५
खाजगी अनुदानित आश्रमशाळा ५
कनिष्ठ महाविदयालये ५
वरिष्ठ महाविदयालये १
शासकिय तंञनिकेतन १
१४) एकुण क्षेत्र ३५,९४४५६२ हे. आर.
१५) लागवडी योग्य जमिनीचे क्षेत्र २०,०९७७७९ हे. आर.
१५) अकृषीक वापराखालील जमिनीचे क्षेत्र १०५२८० हे. आर.
१६) सरकारी पडीत जमिनीचे क्षेत्र १७०१६५ हे. आर.
१७)पडीक जमिनीचे क्षेत्र ४५५७५१५ हे. आर.
१८)वन जमिनीचे क्षेत्र २०८२५३४८ हे. आर.
१९)कुरणाचे क्षेत्र ९२६०१५ हे. आर.
२०)पोट खराबा जमिनीे क्षेत्र ५४५८५२१ हे. आर.
२१)अतिक्रमणा खालील जमिन २३८१५ हे. आर.
२२) प्रमुख पिके एकुण
पिकाचे नांव हेक्टर आर.
१) भात ९७७४६०३
२) नागली ९७८०१५
३) वरई ४११९५२
४) तुर १७६४०८
५) उडीद १२८९६२
६) ऊस
७) कापूस
८) इतर फळ पिके २३८९३३
९) मोगरा ९८०००
२३) जमीन महसुलाची कृषीक मागणी ९१,९३०६८ रूपये
२४) अकृषीक आकारणीची एकुण मागणी ३,६८,४८० रुपये
२५) इतर महसुली मागण्या १) शिक्षण उपकर ८,७५० रूपये
२६) तगाई कर्जाची एकुण बाकी निरंक
२७) सरासरी पर्जन्यमान २५०० मी.मी.
२८) पिण्याच्या पाण्याच्या पुरवठयाची साधने बोअरवेल , विहीरी , नळयोजना ( एकूण साधने ७७९ )
२९) जलसिंचन विहीरींची संख्या ४२९
३०) बागायती जमिनीचे क्षेत्र १६८८९० हे. आर.
३१) जलसिंचनाची साधने व विहीर , नदी
जलसिंचीत क्षेत्र १६८८९० हे. आर.
३२) गुरे व पशु यांची संख्या ६८९०
३३) सार्वजनिक व सहकारी संस्था
१) नगरपंचायत ०१
२) ग्रामपंचायती ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळे ( वाकी, माण, नागझरी )
३) न्याय पंचायत
४) पंचायत समित्या ०१
५) पोलीस ठाणे १ ६) डाक कार्यालय १ ७) पा्रथमिक जि.प.शाळा २३७
८) दुय्यम शाळा
९) माध्यमिक शाळा २३
१०) महाविद्यालये १ ११) सार्वजनिक दवाखाने ७
माणसांकरीता ४
पशुवैधकीय ७
१२) दळणवळणाची साधने रस्ते ( राज्यमार्ग व जिल्हामार्ग )
१३) सहकारी संस्था ६१
१४) सहकारी कारखाने
१५) महीला मंडळे २४६
१६) तरूण मंडळे
१७) भजनी मंडळे ४
१८) तालीम संघ १
३४) अन्नधान्याचे रास्त भाव असलेल्या दुकानांची संख्या ९१
३५) बाजारांच्या ठिकाणांची गांवे विक्रमगड , तलवाडा , कासा , मलवाडा , वसुरी , पाचमाड
३६) सार्वजनिक जत्रांच्या ठिकाणांची नांवे विक्रमगड , तलवाडा , कासा , मलवाडा , वसुरी , पाचमाड
३७) खाद्यगृहांची ( उपहारगृहांची ) एकुण संख्या २९
३८) कुटूंब नियोजन केंद्गांची संख्या ४
३९) वर्षभरात पार पडलेल्या कुटूंबनियोजन संख्या स्त्री ५७७ पुरुष २६ एकुण ६०३
४०) रस्त्यांचे निरनिराळे प्रकार व त्यांची लांबी
प्रथम जिल्हा मार्ग ३०.५० कि.मी.
इतर जिल्हा मार्ग ७३.६८ कि.मी. ग्रामीण मार्ग २६३.९३ कि.मी.
४१) रेल्वे मार्गाची लांबी निरंक
४२) विशेष बाबी
नद्याᅠ १) देहर्जे २) पिंजाळ ३) सुर्या
धरणे १) धामणी २) कवडास
लघूपाटबंधारे १) सजन २) खांड
विक्रमगड तालुका दृष्टीक्षेप
विक्रमगड तालूका भौगोलिक दृष्टया विक्रमगड तालुक्याचे स्थान पूर्वेस, लगत जव्हार पश्चिमेश मुंबईअहमदाबाद रस्ता, दक्षिणठाणे जिल्हा व रायगड जिल्हे आहेत. उत्तरेस दादरा व नगरहवेली आणि गुजराथ यांच्या बरोबर सिमा आहेत. आणि पश्चिमेशअरबी समुद्गाचा किनारा लगत आहे. विक्रमगड तालुक्याच्या उत्तरेस डहाणू पूर्वेस जव्हार, दक्षिणेस वाडा व पश्चिमेस मुंबईअहमदाबाद हायवे आहे.
क्षेत्र आणि प्रशासकीय विभाग
विक्रमगड तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ५५,०२७.२१ हे. आर आहे. विक्रमगड हे गांव ग्रामीण असून पुर्णतःआदिवासी उपयोजन क्षेञ आहे. शासन निर्णय २६जून सन १९९९ मध्ये नव्याने झालेले आहे. सर्वत्र डोंगर टेकडया व लहान मोठया नद्या नाल्यांनी व्यापलेले आहे.
विभाग |
तालुका निहाय उपविभाग |
पंचायत समिती विक्रमगड |
महसुल ९३ गांवे १ बुडीत गाव |
ग्रामपंचायती |
३९ |
ग्रामदान मंडळे |
३ |
नदी किनारी असलेली गांवे खालील प्रमाणे.
देहर्जा नदी : १)शेवता २)आंबेघर ३)बालापुर ४)सुकसाळे ५)गडदे ६)सवादे ७)टेटवाली ८)देहर्जे ९)हातणे १०)मोह बु. ११)कुंर्झे १२)म्हसरोली १३)सावरोली १४)विक्रमगड(ययावंतनगर,ब्राम्हणपाडा)
पिंजाळ नदी :१)अंधेरी २)टेंभोली ३)पोचाडे ४)वाकी ५)मलवाडा ६) बास्ते ७)शेलपाडा
८)कावळे मोठा पुर आल्यास मलवाडा गावंठण पाडयात पुराचे पाणी शिरते.
सुर्या नदी : १)थेरांडा २)कवडास ३)धामणी ४)सावा ५)कासा बु.६)तलवाडा(पारसपाडा)
राखाडी नदी : १)बालापुर २)गडदे ३)वेहेलपाडा.
तालुक्यातील कार्यरत असलेली शासकीय कार्यालये
तहसिलदार कार्यालय विक्रमगड = १
ग्रामपंचायत = ३९
ग्रामदान मंडळे = ३
गटविकास अधिकारी पं.स. विक्रमगड = १
पोलीस निरीक्षक, विक्रमगड (ग्रामीण) = १
उप अधिक्षक भूमि अभिलेख, विक्रमगड = १
सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रमगड = १
ग्रामीण रूग्णालय विक्रमगड = १
तालूका कृषि अधिकारी, विक्रमगड = १
महाराष्टृ राज्य विद्युत मंडळ, विक्रमगड = १
दूरसंचार, निगम लिमिटेड, विक्रमगड = १
प्राथमिक आरोग्य केंद्ग, = (मलवाडा, तलवाडा, कुर्झे) = ३
वैद्यकिय अधिकारी विक्रमगड = १
परिक्षेत्र वन अधिकारी (संरक्षण) विक्रमगड = १
पशू वैद्यकिय अधिकारी विक्रमगड = १
जिल्हा परिषद विश्राम गृह, विक्रमगड = १
मंडळ कृषि अधिकारी, विक्रमगड = १
हिवताप निर्मुलन अधिकारी कार्यालय, विक्रमगड = १
तालुक्यातील कार्यरत असलेली कार्यालये
पोस्ट ऑफीस, विक्रमगड = १
आय. टी. आय. टेक्नीकल, विक्रमगड = १
उप. अभियंता पं.स. विक्रमगड = १
प्रा. आरोगय उपकेंद्ग १ मलवाडा पी. एच.सी. अंतर्गत = ९
प्रा. आरोगय उपकेंद्ग १ तलवाडा पी.एच.सी. अंतर्गत = ६
प्रा. आरोगय उपकेंद्ग १ कुंर्झे पी.एच.सी. अतर्गत = ८
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक :
कार्यालयाचे नांव दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्र.
मा. अपर जिल्हाधिकारी, जव्हार ०२५२०/२२२४८८ ९९६४४७७६९
०२५१/२५२४४१६
मा. निवासी उपजिल्हाधिकारी, ०२५२०/२२२४८७ ९४२३०८१४३८
जव्हार ०२५२०/२२२२९५
मा. जिल्हा पुरवठा अधिकारी, जव्हार ०२५२०/२२२३५५
मा. उपविभागीय अधिकारी, जव्हार ०२५२०/२२२३०४
०२५२०/२२२४६७
शिरस्तेदार ०२५२०/२२२३०४ ९४२२६८५१२१
०२५२०/२२२४६७
मा. तहसिलदार, विक्रमगड ०२५२०/२४०१७२ ९९७५०८९५७८
७) मा. गटविकास अधिकारी ,
पं.स.विक्रमगड ०२५२०/२४०५९४ ९९८७७०२९४८
८) तालुका आरोग्य अधिकारी ०२५२०/२४०६६० ९८७००३७४९९
९) पशुधन विकास अधिकारी ०२५२०/२४०५९४ ९२२६३८३१३२
१०) बालविकास प्रकल्प अधिकारी ०२५२०/२४०५९४ रिक्त पद
११) गट शिक्षण अधिकारी ०२५२०/२४०२०४ ९२७२६०३३०५
१२) उप अभियंता बांधकाम ०२५२०/२४०५९४ ९८५००३८३४१
१३) उप अभियंता पाटबंधारे ०२५२०/२४०५९४ ९८९२४५१६७६
१४) उप अभियंता पाण्ी पुरवठा ०२५२०/२४०५९४ ८९७६४०२६७३
तालुक्यातील एकुण महसुली गावे ग्रामपंचायती पाडे व लोकसंख्या
अ. क्र |
एकुण ग्रामपंचायती व ग्रामदान मंडळ |
एकुण महसुली गावे |
एकुण पाडे |
लोकसंख्या |
|
सन२००१ नुुसार |
सन२०११ नुसार |
||||
१. |
ग्रामपंचायत ३९ ग्रामदान मंडळ ०३ |
९५ (१ गाव बुडीत) |
४२३ |
१०५५४६ |
१३७६२५ |
एकुण ४२ |